मरपली येथील नागरिकांना मिळणार शुध्द पिण्याचे पाणी

72

– जि. प. माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते टाकीचे भूमिपूजन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १ डिसेंबर २०२२ : अहेरी तालुक्यातील मरपली येथे जिल्हा परिषद बांधकाम विभाग गडचिरोली अंतर्गत शुद्ध पिण्याच्या पाण्याची विहीर व टाकी मंजूर करण्यात आली. सदर विहीर व टाकीच्या बांंधकामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. मरपली येथे गाव निर्मितीपासून टाकी उपलब्ध नसून गावातील नागरिकांना शुध्द पिण्याचं पाणी मिळत नव्हते. गेल्या पंचहत्तर वर्षापासून या भागातून निवडुन आलेले लोकप्रतिनिधीकडे अनेकदा मगणी करूनही सदर समस्याचे निराकरण केले नाही. मात्र जि. प. अध्यक्ष यांच्या कडे नवीन विहीर व टाकी साठी मागणी केली असता जिल्हा परिषद बांधकाम विभागातून निधी मंजूर करण्यात आले असून भूमिपूजन सम्पन्न झाले. करोडो रुपये देवून या टाकी व विहीर बांधकाम करण्यात येणार असून प्रत्येक घरी नळ जोळणी करून पाणी उपलब्ध करून देण्यात येईल.या भूमिपूजन कार्यक्रमाला अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री. भास्कर तलांडे, माजी सभापती सौ. सुरेखा आलाम, माजी पंचायत समिती सदस्या सौ. शारदा कोरेत, माजी सरपंच सीताबाई वेलादी, ग्रामपंचायत सदस्या सुनंदा आत्राम, आनंदराव कोंडागुर्ले, माजी सरपंच श्री. हनमंतू कोरेत, माजी उपसरपंच श्री. कार्तिक तोगम, प्रतिष्ठित नागरिक निलेश कूड़मेथे, बापू बेडकी, व्येंकटी कोंडागूर्ले, लचया सिडाम, शंकर कोंडागूर्ले, अशोक दिकोंडा, वासुदेव कोंडागुर्ले, श्रावण कोंडागुर्ले, वेंकटी कुमरे, मल्लेश कंनेबोईना, अमोल कोंडा, मोरेश्वर कोंडगुरले, श्रीनिवास मडावी, नानाजी.कोंडागुर्ले, केशव, गजानन मुंजम, दिगु पेरगु व गावातील नागरिक उपस्थित होते.