इंदिरानगर येथे महात्मा फुले यांना अभिवादन

68

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली /३० नोव्हेंबर २०२२ : येथील इंदिरानगर वॉर्डातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात २८ नोव्हेंबर रोजी महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त तथागत बौद्ध समाज मंडळ इंदिरानगरतर्फे महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शेषराव तुरे, सचिन पाटील, पंढरी भानारकर, बंडू खोब्रागडे, प्रशांत मेश्राम, सौ. अंजली साखरे, सौ. सुनंदा चौधरी, सौ. पोर्णिमा डोंगरे, सौ. देवकन्या उंदीरवाडे, सौ. गौतमी खोब्रागडे, सौ. फुलाबाई खोब्रागडे, सौ. आशा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती प्रज्वलित करून उपस्थितांनी त्रिसरण पंचशील ग्रहण करून केली. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर माहिती सांगून आपआपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन सचिन पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीपक बांबोळे, अक्षय चौधरी, स्वप्नील उंदीरवाडे, आंचल साखरे, नंदिनी साखरे, सौ. सुकेशनी करवाडे, सौ. पुष्पा भानारकर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला वॉर्डातील बहुसंख्य पुरुष व महिला उपस्थित राहून महात्मा फुले यांना श्रद्धांजली वाहून अभिवादन केले.