वसंत भिवगडे यांचा सेवानिवृत्ती सत्कार

283

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली / ३० नोव्हेंबर २०२२ : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली कार्यालयातील कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी वसंत भिवगडे यांचा कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वतीने आज, 30 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक प्रकल्प अधिकारी चंदा मगर होत्या. यावेळी त्यांनी वसंत भिवगडे यांच्या प्रामाणिक सेवाकार्याची स्तुती करून त्यांना सेवानिवृत्तीनंतरच्या जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
प्रमुख अतिथी म्हणून नियोजन अधिकारी प्रफुल पोरेड्डीवार, कार्यालयीन अधीक्षक मिलिंद रामटेके, सहाय्यक लेखाधिकारी दादाजी सोनकर, नीलू उसेंडी, सुधीर शेंडे, सुजित उराडे, संदीप भोयर आदी मान्यवर उपस्थित होते.
नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सहपत्नीक शाल, श्रीफळ तसेच पत्नी सुनिता भिवगडे यांचा साडीचोळी व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. त्यांनी आदिवासी विकास विभागामध्ये प्राथमिक शिक्षक पदापासून तर कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पदापर्यंत तीस वर्षे दोन महिने सेवा केली.
संचालन व आभार प्रदर्शन संतोष कन्नाके यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्तिक कोवे, गणेश पराते, ज्योती पहाणपटे, विशाल नन्नावरे, किशोर मेश्राम, सचिन करणाके, गुलाब बांबोडे, पूजा डंबारे, रामचंद्र दशमुखे, यमाजी मेश्राम, विलास राऊत, अविनाश कोहळे, विश्वनाथ कोहळे, पी. बी. बोरकर, एस. एम. मशाखेत्री, आर. एन. इंगळे, जगन्नाथ कसनवार, ताराचंद शेंडे व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.