नगरसेवक आशीषभाऊ पिपरे चामोर्शीत गुरुवारपासून भरविणार ‘जनता सेवा दरबार’

81

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली/ २९ नोव्हेंबर २०२२ : गडचिरोली विधानसभा मतदार संघातील चामोर्शी येथे गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकभाऊ नेते यांच्या मार्गदर्शनात चामोर्शीचे नगरसेवक आशीषभाऊ पिपरे येेत्या गुरुवारपासून चामोर्शी शहरात ‘जनता सेवा दरबार’ भरविण्यात येणार आहे.

दर गुरुवारी दुपारी 12 ते दुपारी 3 वाजतापर्यंत चामोर्शी शहरातील शिवम अगरबत्ती प्रकल्प संताजी नगर येथील भव्य मैदानात तालुक्यातील प्रत्येक समाजाच्या न्याय हक्कासाठी, सर्वसामान्य गोरगरीब वंचित जनतेसाठी ‘जनता सेवा दरबार’ भरविण्यात येत आहे. सर्वसामान्य व  गोरगरीब जनतेच्या समस्या, शासकीय कामांमध्ये अडथळे किंवा दिरंगाई, शासकीय कर्मचाऱ्यांकडून कार्यालयात काम होत नाही, कोण त्रास देतो?, बँकेत कर्जासाठी चकरा, दवाखाना, तहसील कार्यालय, पंचायत समिती, भूमिअभिलेख, तहसील कार्यालय येथे काम होण्यास विलंब, अन्याय दूर करणे, रुग्णाकरिता वैद्यकीय मदत, घरकूूल योजना व इतर शासकीय योजनांचा लाभ, आयुष्मान भारत कार्ड तयार करणे, ई श्रम कार्ड तयार करणे याकरिता मदत करण्यात येणार आहे.

या जनता सेवा दरबारच्या माध्यमातून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी १०० % प्रयत्न करण्यात येणार आहे. अनुभवी पदाधिकारी व कार्यकर्ते अशा दहा लोकांची सेवाभावी चमू संपूर्ण आठवडाभर आपल्या सेवेत राहणार आहेेत. यात मोफत वकिलांचा सल्ल्ला, कोणताही अडथळा जनता सेवा दरबाराच्या माध्यमातून दूर करण्यात येईल. महिन्यातून दोनवेळा गोरगरीब व सर्वसामान्यांच्या प्रलंबित समस्या घेऊन थेट मंत्रालयात जाणार आहे. तालुक्यातील जनतेने या जनता सेवा दरबाराचा लाभ घेऊन आपल्या अडचणी सोडवाव्यात, असे आवाहन नगरसेवक आशीषभाऊ पिपरे, नगरसेविका सौ. सोनालीताई पिपरे, रमेश अधिकारी यांनी केले आहे.