बजेटमध्ये गडचिरोली जिल्ह्याच्या रस्ते – पूल विकासाकरिता निधी उपलब्ध करून द्या

73

– आमदार डॉ. देवरावजी होळी व आमदार कृष्णाजी गजबे यांचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्रजी चव्हाण यांना निवेदन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली / २९ नोव्हेंबर २०२२ : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम, अतिदुर्गम भागात रस्त्यांची पुलांची अत्यंत आवश्यकता असून येणाऱ्या बजेटमध्ये त्याकरिता निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी व आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्री. रवींद्रजी चव्हाण यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदनाद्वारे केली. यावेळी भाजपाचे जिल्ह्याचे नेते अरुण हरडे, प्रामुख्याने उपस्थित होते.

गडचिरोली विधानसभा क्षेत्रासाठी निधी मिळावा याकरिता मागील काही दिवसात आमदार डॉ. देवरावजी होळी हे सातत्याने सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या भेटीला जात असून जिल्ह्यातील अजूनपर्यंत न झालेल्या रस्त्यांसाठी व लहान नद्या, लहान नाल्यांवरील पुलांसाठी अधिकाधिक निधी मिळावा यासाठी ते सातत्याने प्रयत्न करीत आहेत. आमदार कृष्णाजी गजबे व आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी जिल्ह्यातील या रस्ते पुलांच्या समस्यांबाबत संयुक्तपणे निवेदन देऊन मंत्री महोदयांना जिल्ह्यातील या रस्ते व पूलांसाठी अधिकाधिक निधी येणाऱ्या बजेटमध्ये उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती केली.