पोटेगावात संविधान दिनातून साधली सामाजिक एकता

42

– २२ गावांचा सहभाग: विविध कार्यक्रमांंसह लोकशाहीचा जागर

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली / २९ नोव्हेंबर २०२२ : तालुक्यातील पोटेगाव येथे 22 गावातील सर्व समाजाच्या वतीने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करून सामाजिक एकता साधली. राष्ट्रीय एकात्मता व लोकशाहीचा जागर केला. संविधान दिनानिमित्त मार्गदर्शन व विविध कार्यक्रमांंसह संविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले.

यावेळी झालेल्या सार्वजनिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बामसेफचे राज्य सदस्य जनार्धन ताकसांडे होते.
सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतिवीर बिरसा मुंडा, वीर बाबुराव शेडमाके, विरांगणा महाराणी दुर्गावती मडावी यांच्या प्रतिमेचे पूजन, मालार्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले. स्वागतगीत राणी सुरपाम, ममता सुरपाम, कोमल सुरपाम यांनी गायीले.
प्रमुख अतिथी म्हणून बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज काणेकर, प्रेमलाल वनकर, मुख्याध्यापक मंगेश ब्राह्मणकर, अभिमन्यू सुरपाम, केशव कड्यामी, सरपंच अर्चना सुरपाम, सविता पोटावी, जगदीश मडावी, मनोहर पोटावी, माजी पं. स. सदस्या मालता मडावी, पोलीस पाटील किशोर नरोटे, कांता हलामी, संदीप पोटावी, नितीन पदा, भारत रंगारी, धनराज दामले, दिवाकर पोरतेट, शेखर दातार, बबीता उसेंडी, मोहनदास चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आश्रमशाळेतील इयत्ता दहावीचा विद्यार्थी राजेश तिर्की याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा साकारली होती.
अध्यक्षस्थानावरून जनार्धन ताकसांडे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून आम्हाला अधिकार व हक्क दिले आहे. संविधानाला धक्का लागला तर आपले अस्तित्व धोक्यात येईल. आम्ही भारताचे लोक या शब्दात खूप मोठी ताकद आहे.मागासलेल्या समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी संविधानाची योग्य अंमलबजावणी होणे हाच एकमेव मार्ग आहे. यासाठी सर्वांनी एकजूट होऊन लढा देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केले.
मान्यवरांनी संविधानाबद्दल माहिती देऊन संविधानाचे महत्त्व सांगितले व मार्गदर्शन केले. विद्यार्थिनी अग्नी पोटावी, मनीषा पोटावी, शिवानी पोटावी यांचीही भाषणे झालीत. विद्यार्थिनी करीना नरोटे, स्नेहा गावडे,
सेजल पोटावी, सुष्मिता वड्डे, माला नरोटे, सोनाली पोटावी आदींनी संविधानावर आधारित गीत सादर केले.
गावातील मुख्य मार्गाने रॅली काढण्यात आली. रॅलीत सर्व समाजातील समाजबांधव तसेच कर्मचारी व आश्रमशाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान आश्रमशाळा व जिल्हा परिषद शाळेच्या मुलींनी नृत्य सादर केले.

प्रास्ताविक जिल्हा महाग्रामसभा संघटक शिवाजी नरोटे यांनी केले. संचालन शासकीय आश्रमशाळा पोटेगावचे ज्येष्ठ माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे यांनी केले तर आभार ईश्वर मोहूर्ले यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगेश कड्यामी, संतोष वड्डे, दीपक पदा, दिनेश वड्डे, गणेश मट्टामी, महादेव पदा, ज्ञानेश्वर मुजुमदार, विलास दरो, गिरीश पदा, राहुल पदा, विलास नरोटे, सोनू नरोटे, दिवाकर फुलझले, लोमेश कुकुडकर, विजय रामटेके, सिद्धार्थ गोवर्धन, पंकज रामटेके, परिसरातील ग्रामसभेचे अध्यक्ष, सचिव व सर्व समाज बांधवांनी परिश्रम घेतले.