देवलमरी येथे भोई समाजाच्या समाज मंदिराचे अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन

45

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : देवलमरी येथे भोई समाज जास्त संख्येने वास्तव्यास आहेत. मात्र समाजाच्या सांस्कृतीक तथा परम्परागत रूढी परंपरा, चालीरिती यांची जोपसना करण्यासाठी व कार्यक्रम घेण्यासाठी समाजाच्या समाजभवन नसल्याने अडचण होत होती. भोई समितीच्या नागरिकांनी जागा उपलब्ध असल्याने सदर जागेवर सांस्कृतीक समाजभवन उभारून दिल्यास समाजाचे कार्यक्रम घेण्यास सोईचे होईल व आम्हाच्या समाजाच्या सांस्कृतीक विकासालाही चालना मिळेल. म्हणून या उद्देशाने समाज बांधव जि. प. माजी अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडे निवेदन देवून समाज भवनाची मागणी केली होती. निवेदन स्वीकारताना शब्द दिले होते कि, आपण नेहमीच सर्व समाजाला मदत करत आले असून देवलमरी येथे भोई समाज मोठ्या प्रमाणात असल्याने समाज भवन आवश्यक असून मि शब्द देतो कि येत्या काही दिवसांतच समाज भवनासाठी निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन दिले होते. जिल्हा परिषदेच्या निधीतून मंजूर केले असुन काल सदर समाज भवनाच्या भूमिपूजन जि. प. माजी अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी महेश लेकुर ग्रा. पं. सदस्य देवलमारी, लक्ष्मण आत्राम ग्रा. प. सदस्य देवलमारी, संजूबाई आत्राम ग्रा.प. सदस्य देवलमारी, विमल कुर्री ग्रा.प.सदस्य देवलमारी, संजू बोंडे, येलाय्या तोकला, शंकर गाणला, रमेश तोकला, सत्यम मचारला, नंदू तोकला, शंकर तोकला, अंकुलू तोकला, सत्यम तोकला, गगुलू तोकला, सभय्या तोकला, मुत्तय्या मंचर्ला, पोषय्या गाणला, चंद्रय्या गाणला, मधुकर गाणला, जोगय्या तोकला, किशोर तोकला, हरीष गाणला, शैलेश तोकला, राकेश तोकला, मधुकर तोकला तसेच गावातील नागरिक व पदादिकारी उपस्थित होते.