अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते महागाव (बु.) येथे नवीन ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण सोहळा

56

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्हा परिषद गडचिरोली पंचायत समिती अहेरी अंतर्गत येथे असलेल्या महागाव (बु.) ग्रामपंचायत असून गेल्या अनेक वर्षापासून ग्रामपंचायत भवन नसल्याने नागरिकांना अडचण होत होती. जि. प. माजी अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडे मागणी केली असता, जि. प. अध्यक्ष यांनी ग्रामपंचायत भवनासाठी निधी उपलब्ध करून दिली असून सदर नवीन ग्रामपंचायत भवनाची बांधकाम पूर्णपणे झाले असून सुसज्ज इमारत उभी झाली असून आज माजी जि. प. अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. ग्रामपंचायत भवन नसल्याने नागरिकांनी अध्यक्ष साहेबांंकड़े मागणी केली होती. त्यावेळेस अध्यक्ष साहेबांंनी शब्द दिला होता ते व आज काम पुर्णपणे झालेला आहे. त्यानिमित्य लोकर्पण सोहळा संपन्न झाला. या लोकर्पण सोहळ्याला ग्रा. प. सदस्य महागाव बु. राजेश दुर्गे, सोनू गर्गम, वंदना दुर्गे, ग्रा.प.महागाव खुर्द सरपंच रेणूकताई आत्राम, कु.उमा मडगूलवार ग्रा.प.उपसरपंच महागाव खुर्द, श्रीनिवास आलम सदस्य, गणेश चौधरी, मधुकर आत्राम, प्रतिष्ठित नागरिक चंद्रजी रामटेके, प्रमोद रामटेके, भिमाना पानेम, सदाशिव गर्गम, शंकर झाडे, शंकर अलोने, नारायण अलोने, दामोदर गोंगाले, लक्ष्मण चिंतावार, शंकर आत्राम, सत्यम वसेकर, विजय अलोने, लिंगाजी दहागावकर, गौरुबाई मुंजामकर, लक्ष्मी दुर्गे, वंदना शंकर दुर्गे, डॉ. येरावार, उषा वेलदी, ग्रामसेवक अनिल बंडावार, शिपाई बाबुराव मोहूर्ले, विलास दुर्गे, महेश बाकेवर नगरसेवक अहेरी, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी, राकेश साडमेक व इतर पदाधिकरी कार्यकर्ते उपास्थित होते.