आलापल्ली येथील नरेश बोम्मावार यांच्या घरी राजेंनी दिली सांत्वना भेट

162

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आलापल्ली येथील पदमा नरेश बोम्मावार यांचा चौडमपल्ली येथे दर्शनाला जात असताना ओढ़नी दुचाकीत फसून झालेल्या अपघातात काही दिवसांपूर्वी दुर्दैवी मृत्यु झाला होता.
घटनेची माहिती मिळताच नरेश बोम्मावर यांच्या एटापल्ली मार्गावरील राहत्या घरी जाऊन माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी नुकतीच सांत्वना भेट दिली. बोम्मावार परिवाराशी आस्थेने संवाद साधत या दुर्दैवी घटनेची पूर्ण माहिती घेतली. या दुःखद प्रसंगी राजेंनी बोम्मावार कुटूंबियाचे सांत्वन केले. यावेळी युवा नेते अवधेशरावबाबासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.