कुनघाडा, तळोधी, नवेगाव येथील पाणीपुरवठा योजना बंद न करता सुरूच ठेवा : आ. डॉ. देवरावजी होळी

43

– कुनघाडा, तळोधी, नवेगाव ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेची आढावा बैठक संपन्न

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : परिस्थिती कोणतीही निर्माण झाली तरीही कुनघाडा, तळोधी, नवेगाव येथील पाणीपुरवठा योजना बंद न करता सुरूच ठेवण्यात यावे, अशी सूचना गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी कुनघाडा, तळोधी, आणि नवेगाव ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेची आढावा बैठकीत केले.

बैठकीला जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती प्राध्यापक रमेशजी बारसागडे, तिन्ही गावचे सरपंच, सचिव पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारी व संबंधित प्रमुख पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या नेतृत्वात झालेल्या या नियोजन बैठकीमध्ये तिन्ही गावचे सरपंच व पाणीपुरवठा सभापती यांची पाणीपुरवठा शिखर समिती निर्माण करण्यात आली. त्यानंतर तिन्ही ग्रामपंचायचे सचिव आणि शिखर समिती असे मिळून कार्यकारी समिती स्थापन करण्यात आली. दोन्ही समित्या पुढील भविष्यात जनतेच्या हितासाठी काम करतील व त्यांचा जनतेला लाभ होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.