राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी समारोपात डॉ. शिवनाथजी कुंभारे यांचा जाहीर सत्कार

66

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ शाखा रामनगरचे वतीने आयोजित केलेल्या वंदनीय राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज यांच्या 54 व्या पुण्यतिथी महोत्सवाचा समारोप गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 20-11- 2022 रोजी भरगच्च नागरिकांच्या व गुरुदेव सेवकांच्या उपस्थितीत आनंदाने संपन्न झाला. प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, माजी नगरसेवक प्रमोदजी पिपरे, रमेश भुरसे, गुलाब मडावी, सतीश विधाते, विद्याताई विश्रोजवार, दलितमित्र आजीवन प्रचारक नानाजी वाढई महाराज, मुख्य सचिव पंडितराव पुडके, प्रचारक मुकुंदजी गरमडे महाराज मार्कंडादेव, देवरावजी मोगरकर महाराज निमगाव, उपाध्यक्ष अरविंद पाटील वासेकर, श्रीराम सेवा सुधार समितीचे अध्यक्ष देवरावजी भोगेवार, भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप चलाक चामोर्शी, आर्किटेक्ट संजयजी बर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.
गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यात भरीव तळमळपूर्ण सक्रिय योगदान, भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनात उत्तम कामगिरी आणि संकटसमयी धावून जाणारे दीनदुबळे व दलितांचे कैवारी, गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा सेवाधिकारी माननीय डॉक्टर शिवनाथजी कुंभारे यांचा आमदार देवराव होळी आणि मंडळाचे ग्रामसेवाधिकारी सुरेश मांडवगडे यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व भगवी टोपी देऊन मंडळाचे वतीने विशेष जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गोकुळनगर शाखेचे कोषाध्यक्ष श्री. मारोतराव उईके, सहसचिव श्री. अमित तिवाडे, प्रचारक श्री. मुकुंदाजी गरमळे महाराज मार्कंडादेव, रामनगर शाखेचे कार्यक्रम प्रमुख श्री. राजेंद्रजी भरडकर, गुरुदेव सेवक श्री. अरुण बोडखे यांना आमदार होळी, जिल्हा सेवाधिकारी डॉक्टर शिवनाथजी कुंभारे, ग्रामसेवधिकारी सुरेश मांडवगडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
देशाच्या विकासात गुरुदेव सेवा मंडळाचे कार्य हे खरोखरंच दिशादर्शक असून माणूस घडविण्याचा कारखाना आहे. याकरिता डॉ. शिवनाथजी कुंभारे यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. तसेच मंडळाच्या कार्याची अधिकाधिक प्रगती करण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी मंडळाचे वतीने कार्यकर्त्यांचा केलेला सत्कार यथायोग्य आणि अत्यंत महत्त्वाची आहे, असे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्रतिपादन केले. ह. भ. प. सौ जयश्री गावतुरे हळदी (ता. मूल) यांचे कीर्तन आणि श्री राजू देवतळे नवेगाव पेठ (ता. चिमूर) यांचे विचार प्रकटन या पुण्यतिथीमध्ये जनतेचे विशेष आकर्षण ठरले.
सात दिवसीय पुण्यतिथी महोत्सवाच्या दरम्यान ध्यान, रामधून, प्रार्थना, ग्रामगीता वाचन, वंदनीय राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली, कीर्तन, भजन, विचार प्रकटन, सांस्कृतिक कार्यक्रम, महिला संमेलन, रांगोळी स्पर्धा असे विविध कार्यक्रम घेऊन वंदनीय राष्ट्रसंतांच्या साहित्याचा प्रचार व प्रसार करण्यात आला. सात दिवसांमध्ये सकाळी ध्यानावर अद्याळ टेकडीचे सुबोधदादा, मुकुंदाजी गरमळे, पंडितराव पुडके, सुखदेवजी वेठे, शंकरराव गुरनुले, आत्मारामजी आंबोरकर आणि संध्याकाळी प्रार्थनेवर सौ. संध्या चिलमवार, श्री. मनोहरराव हेपट, श्रीकांत कुत्तरमारे, बंडोपंत बोढेकर, चेतन ठाकरे, राजू देवतळे या तज्ञ मार्गदर्शकांनी आपले विचार प्रकटनातून मार्गदर्शन केले. शेवटच्या दिवशी वंदनीय राष्ट्रसंतांच्या पालखीची शोभायात्रा गडचिरोली नगरातून फिरविण्यात आली. समारोपीय कार्यक्रमात मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर राष्ट्रवंदना घेऊन पुण्यतिथीची सांगता करण्यात आली व महाप्रसाद वितरित करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वय प्रमुख रमेश भुरसे, उप ग्रामसेवाधिकारी, मधुकर भोयर, कोषाध्यक्ष चंद्रभान गेडाम, सचिव कवडूजी येरमे, सहसचिव रामकृष्ण ताजने, सहकोषाध्यक्ष संजय रामगुंडेवार, राजेंद्र भरडकर, नामदेव शेंडे, अमलकृष्ण हलधर, दिलीप मेश्राम, सुरेश भोयर, पुरुषोत्तम निलेकार, कार्तिकस्वामी कोवे, रमेश उरकुडे, सुरेश फुलबांधे, संजय मांडवगडे, भूपेंद्र येरमे बापूजी गेडाम, लक्ष्मण आलम, श्रीराम सोनटक्के, आनंद कुमरे, जीवन मडावी, अरुण बोडके, अशोक शेडमाके, आनंद मांडवगडे, तुलसीदास अलाम, करण फुलबांधे, शामरावजी नैताम, अरुण तायवाडे, गौतम काळे, किशोर खोब्रागडे, चंद्रभान जांभुळकर, किसन मडावी, पुरुषोत्तम कुळमेथे, विवेक भुरसे, नथूजी चिमूरकर, जयभारत मेश्राम, जनार्दन पाल, चरणदास पाटील बोरकुटे, मसराम, आदित्य आलम, अमित तिवाडे, धर्मदास नैताम, नथुजी चिमूरकर, बाबा नक्षीने, संदेश नक्षीने, रेमाची बावणे, गोविंदाजी वासेकर, भांडेकर, मारोती मडावी, बाबुराव वाकुडकर, तुलसीदास सोरते, घनश्यामजी जंगठे बाबुराव बावणे मारकबोडीचे संभाजी मोहरले, शोधूनवार, मनीराम भांडेकर, किशोर पोहनकर, छाया श्रीपादवर, मंदा मांडवगडे, लता फुलबांधे, मंदा काळे, स्नेहल, हेमलता भोयर, अलका देशमुख, वर्षा शेडमाके, नीता कतलपवार, लता आकनूरवर, वेणूताई मूलेवार, अंजना वाढई, शोभाताई कुंभारे, सुनिता मडावी, रंजना भुरसे, निकिता तिवाडे, मनीषा उरकुडे, सोनी मांडवगडे, वनमाला मुनघाटे, गंगा तायवाडे, इजनकर, अर्चना नक्षीने, मंगला कोवे, आकांक्षा उरकुडे, भिवराबाई आत्राम करंजी कुसुमताई आलम, सुधाताई चौधरी, अनिता भडांगे, वंदना जुवारे, नीर्जा महेशकर, विना सिडाम, कलिता उरकुडे, कृष्णा पदा, हितेश गुजलवार, गड्डमवार, ओम कतलपवार, श्रवण धात्रक, प्रणय चने, चिरंजीव चिमूरकर यांनी मनोभावे सहकार्य केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवाधिकारी सुरेश मांडवगडे अहवाल वाचन प्रचारक दिलीप मेश्राम, आभार प्रदर्शन सह कोषाध्यक्ष संजय रामगुंडेवार आणि सूत्रसंचालन सहसचिव रामकृष्ण ताजने यांनी केले.