मेडिगट्टा धरणाच्या बाधित शेतकऱ्यांच्या उपोषणाची दखल आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी घ्यावी

58

– आमदार डॉ. देवरावजी होळी यांना उपोषणकर्त्यांचे निवेदन

– उपोषणाची दखल घेऊन मार्ग काढण्यासाठी पूर्ण ताकतीने प्रयत्न करू आमदार महोदयांचे आश्वासन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मागील अनेक दिवसांपासून मेडिगट्टा धरणाच्या बाधित शेतकऱ्यांचे आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सिरोंचा येथे उपोषण सुरू असून अजूनपर्यंत प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे आपण याकडे लक्ष देवुन आमच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करावे व हे उपोषण सोडवावे, अशी मागणी करणारे निवेदन उपोषणकर्त्यांच्या वतीने आमदार डॉ. देवरावजी होळी यांना देण्यात आले. यावेळी सिरोंचा येथील सारीख शेख, व्यंकट स्वामी, राजाराम येथम, शंकर नरहरे सिरोंचा भाजपा ता. अध्‍यक्ष प्रामुख्याने उपस्थित होते.

मेडिगट्टा धरणामुळे सिरोंचा तालुक्यांतील अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली आली. यामुळे आपल्याला भविष्यात होणाऱ्या नुकसानीमुळे येथील शेतकरी चिंतेत सापडलेला आहे. त्यामुळे आपल्या मागणीचा विचार करून आपले नेतृत्वात आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती त्यांनी आमदार डॉ. देवरावजी होळी यांची भेट घेऊन निवेनाद्वारे केली आहे.
आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार, असे आश्वासन त्यांनी यावेळी निवेदकाना दिले.