चामोर्शी येथील घरकूल धारकांंना ५ ब्रास मोफत रेती उपलब्ध करून द्यावी

62

– चामोर्शी येथील घरकूल लाभार्थ्यांचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांना निवेदन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : शासनाने घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास मोफत रेती उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला असतानाही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत चामोर्शी येथे सुरू असलेल्या घरकुलांचे काम रेतीअभावी थांबलेले असल्याने या घरकुल धारकांना ५ ब्रास मोफत रेती उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून चामोर्शी येथील घरकुल लाभार्थ्यांनी आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्याकडे केली आहे.