विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : मुलचेरा ग्रा. पं. कोठारी अंतर्गत लभानतांडा, कोपरल्ली चेक व कोलपल्ली येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा. अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. अनेक वर्षापासून लोकांच्या मागणी असताना या कडे दुर्लक्ष केले जात होते. मात्र सरपंच व सदस्यांनी गावातील समस्या मा. जि. प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडे गावातील समस्या विषय सांगितले त्या वेळेस जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावातील विविध विकास कामे मंजूर करून गावातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आले आणि सदर कामांचे भूमिपूजन करण्यात आले तर गावातील नागरीक समादान व्यक्त केले. या भूमिपूजन सोहळ्याला मा. रोशनी कुसनाके सरपंच कोठारी, कालिदास कुसनाके सदस्य, सौ. पल्लवीताई रतनपुरे सदस्या, जीवनकला तलांडे सदस्या, अरुण कडते सरपंच, कालिदास चौधरी, सौ. सुनीता कुसनाके नगरसेविका मुलचेरा, नरेश कोवे, पंकज कुसनाके, उमेश आत्राम, सुरेश कुसनाके, शामराव पोरतेट, गुरुदास कडते, संदीप तोरे, रवींद्र झाडे, कार्तिक डोखे, मनीष मारटकर, कमल बाला, श्रीकांत समदार व गावातील नागरीक उपस्थित होते.