अखंड तारकब्रह्म नाम कीर्तन व रासलीला उत्सवास माजी जि. प. अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी दिली भेट

60

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : श्री श्री राधाकृष्ण सार्वजनिक भजन मंदिरतर्फे आयोजित अखंड तारकब्रह्म नाम कीर्तन व रासलीला उत्सवास माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी भेट देऊन कृष्णभगवानचे आशीर्वाद घेतले.

मुलचेरा तालुक्यातील सुंदरनगर येथे परंपरागत सुरू असलेल्या प्रसिद्ध कीर्तन व रासलिला कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना मंदिर कमिटीतर्फे कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले होते आणि अजयभाऊ नेहमीप्रमाणे नचुकता आपल्या व्यस्त दैनंदिनुतून वेळ काडून कार्यक्रमाला भेट दिले व राधा कृष्ण मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. या वेळेस माजी जिल्हा परिषद सदस्य रवीभैया शहा व मंदिर कमिटीचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.