Home गडचिरोली आष्टी ते आलापल्ली राष्ट्रीय मार्गावरील शेतीची नुकसान भरपाई द्या

आष्टी ते आलापल्ली राष्ट्रीय मार्गावरील शेतीची नुकसान भरपाई द्या

128

– जि. प. माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून केली मागणी

– निवेदनाची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने शेतीच्या पंचनाम्याला सुरुवात

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आष्टी ते आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग क्र. 353 या तलाठी कार्यालय साजा क्र. 9 मधील बोरी, राजपूर प्याच, शिवनीपाठ या गावातील शेतकरी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह करण्यासाठी शेती करत आहेत. मात्र गेल्या वर्षापासून सूरजागड येथील लोहा खनिज उत्खनन करून दररोज हज़ारों ट्रक ये-जा करत असल्याने मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतीवर पूर्णत धूळ पसरत असल्याने शेतातील उभे पिक कापूस,धान पिके नष्ट होऊन शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहेत. तरी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची मोका पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देवून मागणी केली. यावेळी उपस्तीत गावातील प्रतिस्टित व शेतकरी श्री. शंकर कोडापे सरपंच बोरी, सौ. मीनाताई वेलादी सरपंच राजपूर प्याच, सुरेश गंगाधरीवार माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य, सुरेश आदे, गोपाळ आदे, चंदु मौहूर्ले, बळवंत आदे, नागेश मोहूर्ले, मीना कावळे, रुपेश चांदेकर, सतीश दैदावार, विलास निकेसर, नागेश वेलादी, शंकर पम्पेलवार, शायलू मडावी सरपंच खमनचेरु,प्रभाकर मडावी,मारोती मडावी,नितीन गुंडावार, अजय मडावी, शोभा मडावी, मधुकर वेलादी, शंकर कम्पेलवार, रुपेश चांदेकर, शंकर निकेसार, बापू ठाकरे, रामुलु कुळमेथे, मधुकर वेलादी, जितेंद्र शेंडे, सुरेश आदे, सुरेश निकेसर, नागेश मोहूर्ले, रामभाऊ आदे, गोपाळा आदे, पेंटू अलोने सह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!