विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथे सोमवार, १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता सीओई इमारतीत, जिल्हास्तरीय भव्य “पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी मेळावा” आयोजित करण्यात आलेला आहे. सदर मेळावा सर्व उत्तीर्ण माजी प्रशिक्षणार्थांसाठी असून सर्व व्यवसायाच्या उमेदवारांना यात सहभागी होता येईल. महाराष्ट्रातील नामांकित कंपन्याचे प्रतिनिधी भरती मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहे . शिकाऊ उमेदवारी करता निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार कंपनीतर्फे फॅसिलिटी उपलब्ध असणार आहे. सदर मेळाव्याचे आयोजन बीटीआरआय चंद्रपूर यांच्या सहकार्याने होत असून याकरिता इच्छुक उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी बीटी.आर.आय.सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार प्रणाली दहाटे (मो. 9049763336) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य संतोष साळुंके यांनी केले आहे. तसेच जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थांनी या मेळाव्यास उपस्थिती दर्शवून मेळाव्याचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी आवाहन केले आहे.