साहित्यिक व कलावंतांनी पुरस्कारासाठी पुस्तकाच्या दोन प्रती सादर करण्याचेे आवाहन

73

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : झाडीबोली साहित्य मंडळ गडचिरोलीच्या वतीने १ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत प्रकाशित झालेल्या गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या चार जिल्ह्यातील लेखक/कवींच्या उत्कृष्ट साहित्यास खालीलप्रमाणे पुरस्कार देण्याचे ठरले आहे. त्यासाठी कवी लेखकांनी आपल्या प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या दोन प्रती, डॉ. चंद्रकांत लेनगुरे, चामोर्शी रोड, साईनगर, गडचिरोली या पत्त्यावर पोस्टाद्वारे किंवा प्रत्यक्ष दिनांक १५/११/२०२२ पूर्वी पोहचेल अशा बेताने पाठवाव्या. त्यानंतर आलेल्या पुस्तकांचा पुरस्कारासाठी विचार केल्या जाणार नाही.

गट १) झाडीबोलीतील उत्कृष्ट पुस्तकास १ पुरस्कार – (यात कथा, कविता, कादंबरी, वैचारिक सर्व साहित्य प्रकार समाविष्ट असेल.) यामधून फक्त एका पुस्तकाला पुरस्कार प्रदान करण्यात येईल. गट २) प्रमाण मराठी भाषेतील कविता संग्रहास एक आणि कवितासंग्रह व्यतिरिक्त इतर साहित्य प्रकारास एक असे दोन पुरस्कार, गट ३) मध्ये लोक कलावंत पुरस्कार -१ (यांनी केलेल्या कार्याचा अहवाल प्रतिष्ठित व्यक्तींच्या प्रमाणपत्रासह सादर करावा).

अटी : १) लेखक, कवी,.लोक कलावंत हा झाडीपट्टीतीलच असावा. २) मंडळाने घेतलेला निर्णय बंधनकारक राहील. चारही पुरस्काराचे स्वरूप – एक हजार एक रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे आहे. तरी झाडीपट्टीतील तमाम लेखक, कवींनी पुरस्कारासाठी आपापले प्रकाशित ग्रंथ वेळेत पाठवावे, असे आवाहन झाडीबोली साहित्य मंडळ गडचिरोलीचे सचिव श्री कमलेश झाडे यांनी (संपर्क -९४२३६४६७४३) पत्रकाद्वारे केले आहे.