व्याहाड खुर्द येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून कॅन्सरग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत

110

विदर्भ क्रांती न्यूज

सावली : राज्याचे माजी मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडून व्याहाड खुर्द येथील कॅन्सर ग्रस्त नागरिक अशोक दामोधर लोणारे यांना पुढील उपचारासाठी आर्थिक मदत देण्यात आली.
राज्याचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार विजयभाऊ वडेट्टीवर हे नुकतेच सावली तालुका दौऱ्यावर आले असता व्याहाड खुर्द येथील काँग्रेसचे कार्यकर्ते निखिल सुरमवार, राजू टोंगे, केशव पाटील भरडकर माजी सरपंच यांनी श्री. लोणारे यांच्या तब्येतीची माहिती दिली होती. तत्काळ माननीय विजयभाऊ वडेट्टीवार यांनी सदर बाब माहित होताच आर्थिक मदत पाठविली.
माननीय विजयभाऊ वडेट्टीवार यांनी आजपर्यंत अनेक रुग्णांना मदत केलेली आहे, त्याचीच प्रचिती आज पुन्हा बघायला मिळाली. जनसेवा ही खरी ईश्वर सेवा असते.
सदर आर्थिक मदत व्याहाड खुर्दचे माजी सरपंच केशव पाटील भरडकर यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी राजू पाटील टोंगे ग्रामपंचायत सदस्य, अनिल पाटील मशाखेत्री, सावली तालुका काँग्रेस अध्यक्ष नितीन गोहणे उपस्थित होते.