खासदार अशोकजी नेते यांच्या प्रयत्नाने ३० खाटांच्या वाढीव रुग्णालयास ८ कोटी ७३ लक्ष रुपयांचा निधी मंजूर

110

– निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांचे जाहीर आभार

– आता ५० खाटांच्या रुग्णालयात धानोरा तालुक्यातील नागरिकांना मिळणार वाढीव आरोग्य सेवेचा लाभ

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने व केलेल्या प्रयत्नाने धानोरा येथे ३० खाटांच्या वाढीव रुग्णालयास नुकताच मंजुरी मिळाल्याने आता या ठिकाणी ५० बेडचे मोठे अद्यावत रुग्णालय होणार आहे. त्याचा लाभ धानोरा तालुक्यातील शेवटच्या भागातील गोरगरीब रुग्णांना मिळणार असून त्यासाठी शासनाने ८ कोटी ७३ लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

धानोरा तालुक्यातील नागरिकांनी खासदार अशोकजी नेते यांच्या प्रयत्नांना मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुका हा अति दुर्गम नक्षलग्रस्त भाग असून या ठिकाणी आरोग्य सेवेच्या मुबलक सुविधा नाहीत. पुढील उपचारासाठी रुग्णांना नेहमीच छोट्या छोट्या कारणासाठी सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे दाखल व्हावे लागते. त्यामुळे आता वाढीव ३० खाटांचे रुग्णालय मंजूर झाल्याने या ठिकाणी धानोरा तालुक्यातील रुग्णांना त्याचा लाभ मिळणार आहे.

रुग्णालयास आवश्यक निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार अशोकजी नेते यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे जाहीर आभार मानले आहे.