स्वामी समर्थ सत्संग मेळाव्यात गुरूपुत्र चंद्रकांतदादा मोरे यांच्या हस्ते माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांचा सत्कार

40

– गडचिरोली येथे श्री साई समर्थ सत्संग मेळावा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : श्री. स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्र गडचिरोलीच्या वतीने अखिल भारतीय श्री. स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरच्या मार्गदर्शनात गडचिरोली येथील कात्रटवार कॉम्प्लेक्सच्या सभागृहात भव्य सत्संग मेळावा व अमृततुल्य ही हितगुज कार्यक्रम परमपूज्य गुरुमाऊली यांचे सगुण स्वरूप गुरुपुत्र आदरणीय श्री. चंद्रकांतदादा मोरे, अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठाचे प्रशासकीय प्रमुख यांच्या विशेष मार्गदर्शनामध्ये सत्संग मेळाव्याचा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून गडचिरोलीच्या माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, माजी नगरसेवक तथा भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, माजी कृषी सभापती अतुलभाऊ गण्यारपवार, गडचिरोली जिल्हा सेवा केंद्राचे प्रा. विजय दिघडे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी सर्वप्रथम माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे व माजी नगरसेवक प्रमोदजी पिपरे यांनी गुरूपुत्र आदरणीय चंद्रकांतदादा मोरे यांचे पुष्पगुच्छ देऊन गडचिरोली नगरीत आल्याबद्दल मनपुर्वक स्वागत केले. तदनंतर गुरूपुत्र आदरणीय चंद्रकांतदादा मोरे यांच्या हस्ते गडचिरोली शहराच्या विकासासाठी व स्वच्छ सुंदर व आरोग्यमुक्त शहर करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या शहराच्या माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे व मा. नगरसेवक प्रमोदजी पिपरे यांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमांमध्ये गुरूपुत्र आदरणीय चंद्रकांतदादा मोरे यांनी सर्व शेकडो सेवाकऱ्यांना आपल्या अमृततुल्य वाणीतून परमपूज्य श्री. स्वामी समर्थ महाराज यांच्या समाजासाठी केलेल्या उत्कृष्ठ कार्याची सखोल माहिती दिली व चांगले निरोगी जीवन जगण्यासाठी व सदविचार आचरणात आणून चांगले कर्म करणे व आपल्या मिळकतीचा काही भाग तरी दिन दलित गरीब, शोषित पीडितासाठी दान करण्याचा मुलमंत्र उपस्थित भाविक व सेवाकऱ्यांना दिला.

या सत्संग मेळाव्यात जिल्ह्यात सत्संग सेवा केंद्र चालवून नागरिकांची सेवा करणाऱ्या सेवावरतींचा आदरणीय गुरुपुत्र चंद्रकांतदादा मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मेळाव्याचे प्रास्ताविक प्रा. विजय दिघडे यांनी तर संचालन प्रा. अतुल खडसे यांनी केले. मेळाव्याला हजारो भाविक, सेवेकरी उपस्थित राहून अमृत वाणीचा लाभ घेतला.