माजी जि. प. अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते भव्य टेनिस बॉल क्रिकेट व व्हॉलीबाल स्पर्धेचे उद्घाटन

69

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील न. प. अतंर्गत येणाऱ्या दुब्बागुडम येथे डी कॅपिटल क्रीडा मंडळ दुबई यांच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट व व्हॉलीबाल स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते. सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला पारितोषिक मा. जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून तर दुसरा व तिसरा असे तीन पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहेत. सदर स्पर्धेचे उद्घाटन श्री. अजयभाऊ कंकडालवार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर श्री. निलेश वेलादी सरपंच, श्री. प्रमोद आत्राम माजी सरपंच पेरमल्ली, माजी सरपंच सुधाकर तिम्मा, प्रशात गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी, तपेश भय्या हलदर, नरेंद्र गर्गम, लालसू आत्राम होते. तर कार्यक्रमाच्या संचालन व आभार प्रदर्शन श्री. कोलू पुनगाठी यांनी केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री. कोलू पुंगाटी, उपाध्यक्ष राकेश पुंगाटी, कोषाध्यक्ष अमलू तेलामी, चैतु पिडसे, बना पंगाटी, राकेश पंगाटी, चैतु पिडसे, अमलू तेलामी, घिस्सु पंगाटी, डोलू वड्डे, पुसू तेलामी व गावातील नागरिक उपस्थित होते.