राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडून दोन लाखाची देणगी

58

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील पेरमिली येथील तपशील बुद्ध विहाराला माजी राज्यमंञी तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडून दोन लाखाची देणगी देण्यात आली. 26 नोव्हेंबर 2022 ला बुध्द मुतीॕची प्रतिष्ठापणा त्यांच्या उपस्थित करण्यात येणार आहे. संविधान दिनाचे औचित्य साधून पेरमिली येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी आर्थिक सहकार्य करण्याची विनंती तपशील बुद्ध विहाराच्या पदाधिका-यांनी माजी राज्यमंञी राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडे केली होती. राजे अम्ब्रिशराव यांनी तत्काळ दोन लाखाची मदत देऊन सहकार्य केले. यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य प्रशांत डोंगे, तपशील बुद्ध विहार पेरमिलीचे अध्यक्ष शंकर कुंभारे, उपाध्यक्ष देविदास दहागावकर, सदस्य मेश्राम यांच्यासह पेरमिली येथील गावकरी उपस्थित होते.