दंडार लोकजागृतीचे प्रभावी माध्यम : खासदार अशोक नेते

58

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गाव खेड्यात दंडार हे लोकजागृतीचे प्रभावी माध्यम आहे. यातून देश व समाज हिताचे चांगले विचार जनतेनी आत्मसात करावे, असे आवाहन खा. अशोकजी नेते यानी केले.
देशात जे पुण्याच व धर्माचे कार्य करुन जनहिताकरिता आपला वेळ देतात त्यानाच जनता सन्मान देते. आपण पण पुण्याचे कार्य करावे, असे मत प्रकाश गेडाम, प्रदेश सरचिटणीस (संघटन)भाजपा एस टी मोर्चा, महाराष्ट्र यानी व्यक्त केले.
चामोर्शी गोंड मोहल्ला येथे जय बजरंग बहुउद्देशीय सामाजिक संस्था द्वारा आयोजित नवयुवक दंडार मंडळ संताजी प्रभाग क्रमांक तीनच्या वतीने “पाप पुण्य अर्थात सत्याची कसोटी” या दंडार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या दंडारीचा आनंद घेण्यासाठी प्रचंड जनसागर उपस्थित होता. यावेळी खा. अशोकजी नेते हे उद्घाटक म्हणून तर श्री प्रकाश गेडाम सह-उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्ष म्हणून नगरसेवक श्री. आशीषजी पिपरे उपस्थित राहुन मार्गदर्शन केले.
यावेळी मंचावर खा. श्री. अशोकजी नेते, श्री. प्रकाश गेडाम, प्रदेश सरचिटणीस (संघटन) भाजपा एस टी मोर्चा, महाराष्ट्र. श्री. स्वप्नीलजी वरघंटे, प्रदेश सदस्य भाजयुमो महाराष्ट्र, श्री. लोमेशजी बुरांडे उपाध्यक्ष न. पंं. चामोर्शी, श्री. आशीषजी पिपरे नगरसेवक चामोर्शी, श्री. अशोकजी धोडरे, सोनाली पिपरे नगरसेविका चामोर्शी व पदाधिकारी उपस्थित होते.