चंद्रपूर महानगरातील जिल्हा कारागृह परिसरात दि. 21 ऑक्टोबर रोजी पवित्र शहीद स्मृतीस्थळावर पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन करताना ते बोलत होते. गोंडकालिन वारश्यांने समृध्द चंद्रपूर शहराची ख्याती बाबुरावांच्या हौतात्म्याने अखिल भारताच्या कानाकोपऱ्यात पोहचली असल्याचे सांगत अहीर यांनी तमाम आदिवासी बांधवांचे श्रध्दास्थळ असलेले हे ठिकाण सर्वांच्या श्रध्देचे तीर्थक्षेत्र व्हावे, अशी भावना व्यक्त केली. प्रत्येकांनी या शहीदस्थळी माथा टेकून या क्रांतीवीराच्या असामान्य शौर्यातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
या पुण्यस्मृती अभिवादन कार्यक्रमास हरिश्चंद्र अहीर, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, खुशाल बोंडे, शहिद बाबुराव शेडमाके समितीचे अध्यक्ष दयालाल कन्नाके, उपाध्यक्ष विलास मसराम, श्याम गेडाम, गणेश गेडाम, भाजपा अनुसूचित जमाती जिल्हाध्यक्ष धनराज कोवे, प्रकाश कुमरे, विठ्ठल कुमरे, राधाबाई सिडाम, सविता मसराम, अॅड. स्नेहल कन्नाके, कमलेश आत्राम, अरविंद मडावी, प्रा. संतोष आडे, डॉ. पंकज कुळसंगे, रविंद्र तुमराम, भाजपा ओबीसी मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष विनोद शेरकी, मुग्धा खांडे, बाळू कोलनकर, पराग मलोडे, पुनम तिवारी, गौतम यादव, चंदन अहीर, राहुल सुर्यवंशी यांचेसह आदिवासी बांधव, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात यंदाही अहीर कुटूंबियाव्दारे स्व. कालिदास अहीर स्मृतीप्रित्यर्थ या शहीदस्थळी आलेल्या अनुयायींना अन्न वाटप करण्यात आले.



