सुपरफास्ट ट्रेनचे जंक्शन नागभिड व वडसा येथे स्टॉपेज (थांबा) ची मागणी पूर्ण : खा. अशोकजी नेते यांच्या प्रयत्नाला यश

134

– खा. अशोकजीे नेते यांनी रेल्वेसंबंधी अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लाऊन पूर्णत्वास अखेर यश प्राप्त केल्याने दिल्ली येथे डॉक्टर संदीपजी महात्मे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मानले आभार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : खा. अशोकजी नेते यांनी संसदेत व केंद्रीय रेल्वेमंत्री यांना केलेल्या सततच्या पाठपुराव्याला व प्रयत्नाला अखेर यश आल्याने चांदाफोर्ट, (वडसा)- देसाईगंज- गोंदिया या रेल्वे मार्गावरील पॅसेंजर गाड्या चालु करून तसेच मागणीप्रमाणे सुपरफास्ट ट्रेनचे स्टॉपेज (थांबा) नागभिड, वडसा व पॅसेंजरचे सालेकसा या ठिकाणी दिल्याने दिल्ली येथे डॉक्टर संदीपजी महात्मे आय.ए.एस प्रायव्हेट सचिव, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे, कम्युनिकेशन अँड इलेक्ट्रॉनिक अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी भारत सरकार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन खासदार अशोकजी नेते यांनी आभार मानले.