Home गडचिरोली माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांनी घेतले शहरातील दुर्गामातेचे दर्शन

माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांनी घेतले शहरातील दुर्गामातेचे दर्शन

134

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांनी दिनांक 6 ऑक्टोबर रोजी गडचिरोली शहरातील रामनगर वार्ड क्र. 19 व 20, गोकुळनगर वार्ड क्र. 22, 23 तसेच लांझेंडा वार्ड, स्नेहनगर व इंदिरानगर, हनुमान वार्ड, तेली मोहल्ला, कॉम्प्लेक्स- विसापूर इत्यादी वार्डातील जय माँ दुर्गा मातेच्या व शारदा मातेच्या मंडळांना भेटी दिल्या व वार्डातील समस्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच माँ दुर्गेचे व शारदा मातेचे दर्शन घेऊन सर्व नागरिकांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. रामनगरातील जय माँ बाल दुर्गा मंडळ येथे त्यांनी दुर्गा मातेचे दर्शन घेतले व सर्व महिला, नागरिक व युवक-युवतींना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी सौ. भावना अतुल हजारे, जय माँ बाल दुर्गामंडळाच्या अध्यक्ष हेमाताई डोंगे, सचिव सुरेखा बल्लमवार, कोषाध्यक्ष सुषमाताई येवले, उपाध्यक्ष ललिता ब्राम्हणवाडे, सदस्या वर्षाताई शेडमाके, सुमनबाई गजानन भुरसे, पुष्पाताई कोवे, वनिता रवींद्र भुरसे, उज्वला राजेंद्र भुरसे, मोहिनीताई, टिंगुसले व अन्य महिला सदस्य उपस्थित होते.
गोकूळनगर वार्डात दुर्गा मातेचे दर्शन घेतेवेळी भाजपचे प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, युवा नेते निखिल चरडे, भाजपचे श्यामजी वाढई व अन्य नागरिक महिला उपस्थित होते. तसेच हनुमान वार्ड, तेली मोहल्ला व विसापूर कॉम्प्लेक्स वार्डात देवीचे दर्शन घेताना माजी नगरसेवक तथा भाजपचे शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, माजी नगरसेविका वैष्णवीताई नैताम, वार्डातील महिला, नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!