आधारविश्व फाऊंडेशन गडचिरोलीतर्फे नवदुर्गा उत्सव मंडळ आशीर्वादनगर गडचिरोली येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात खा. अशोकजी नेते यांंची प्रमुुख उपस्थिती

43

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आधारविश्व फाऊंडेशनच्या वतीने नवदुर्गा उत्सव मंडळ आशीर्वादनगर गडचिरोली येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात खा. अशोकजी नेते यांनी सेवा पंधरवडा कार्यक्रमाच्या निमित्याने उपस्थिती दर्शविली.

आरोग्याच्या दृष्टिकोनातून शुगर तपासणी, बी. पी, हिमोग्लोबिन, सिकलसेल, किडनी, लिव्हर, थायरॉईड, स्त्री रोग तपासणी आदी बाबत या शिबिरात १५३ लोकांची मोफत तपासणी करून त्यांना मोफत औषधी, गोळ्याचे वितरण केले ही बाब कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन खा. अशोकजी नेते यांनी केले. अशा शिबिराचे आयोजन करणे अतिशय महत्त्वाचे व गरजेचे आहे. या शिबिराच्या माध्यमातून तळागाळातील सामान्य जनतेपर्यंत आरोग्याच्या सोयी सुविधा पोहोचविणे व आरोग्य क्षेत्राकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, असेही ते याप्रसंगी म्हणाले.

या कार्यक्रमाचे आयोजक सौ. गीताताई एस. हिंगे यांना सामाजिक कार्यात रुची असल्याने या शिबिराच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी करून सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. या शिबिराच्या माध्यमातून अनेक लोकांनी लाभ घेतला. यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, नर्स, डॉक्टर व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहभागाने हा कार्यक्रम पार पडला.

याप्रसंगी खा. अशोकजी नेते यांच्यासह किसान आघाडीचे प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे, महिला आघाडीच्या उपाध्यक्षा तथा आधारविश्व फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. गिताताई एस.हिंगे, उपाध्यक्ष संजयजी बारापात्रे, शेखर गडसुलवार, सुनिता आलेवार, सुनिता साळवे, सुनील हिंगे विकास अधिकारी, रक्षमवार, मंगेश रणदिवे, गजानन दहिकर, कविता बारापात्रे तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.