लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या सौजन्याने 6 गावातील 572 विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण

87

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या सौजन्याने एटापल्ली तालुक्यातील दुर्गम नक्षलग्रस्त भागातील हेडरी, मंगेर, सुरजागड, नेनंडर, पूरसगोंदी आणि मल्लमपहाडी अशा 6 गावातील 572 विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले आहे. कंपनीच्या या स्तुत्य उपक्रमाचे परिसरात कौतुक केेेल्या जात असून पालक व विद्यार्थ्यांनी आभार मानले आहे.