ना. संजय राठोड 30 सप्टेंबरला गडचिरोलीत

46

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. संजय राठोड 30 सप्टेंबर 2022 रोजी  गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. शासकीय वाहनाने सकाळी आरमोरी येथे आगमन. आरमोरी येथे नवदुर्गा मंडळाच्या देवीचे दर्शन. सकाळी गडचिरोली येथे आगमन. दुपारी खाजगी कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे आगमन व राखीव. दुपारी खाजगी कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 4 वाजता शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांंसमवेत शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे बैठक. त्यानंतर शासकीय मोटारीने चंद्रपूरकडे प्रयाण करतील.