कोंढाळा येथे शॅडोच्या माध्यमातून युवकांनी प्रेरणा घेऊन कौशल्य विकास साधावा : खा. अशोकजी नेते

95

– रक्तदान शिबिराचे आयोजन व प्रमाणपत्र वितरण सोहळा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : वडसा तालुक्यातील कोंढाळा येथे आयोजित कार्यक्रमप्रसंगी शॅडो म्हणजे ग्रामविकासाची नवी चळवळ आहे, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केेले. शॅडो पंचायत कोंढाळा यांच्या माध्यमातून नियमीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. अश्यातच रक्तदात्यांचा सत्कार सोहळा शॅडो पंचायत कोंढाळा यांच्या वतीने आयोजित करण्यात आला.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व ग्रामविकासासाठी सामाजिक बांधिलकी जपत परिवर्तनकारी उद्देश ठेवून आदर्श गाव व समृद्ध गाव बनवन्याच्या दृष्टीने शॅडोचे प्रयत्न सुरू आहेत. याच कार्याची दखल घेत गडचिरोली चिमुर क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांनी कोंढाळा येथील शॅडो पंचायतीला भेट दिली.

शॅडोची संकल्पना जाणून स्वयंसेवकांचे त्यांनी कौतुक करत शॅडोच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कोंढाळा गावातील तरूणांकडून जिल्हातील तरूणांनी नक्कीच प्रेरणा घेत आपल्या कला कौशल्याचा ज्ञानाचा आणि अनुभवांचा उपयोग आपल्या गावासाठी नक्कीच करावा अशा तरूनांची आज या देशाला गरज आहे, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

कोंढाळा येथे शॅडो पंचायत कोंढाळा यांच्या संकल्पनेतून गणेशोत्सवादरम्यान रक्तदान शिबीर झालेला होता. त्यात रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता यात रक्तदात्यांना खासदार अशोकजी नेते व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आले. रक्तदान हे श्रेष्टदान असून यावर मार्गदर्शन करत तरूणांनी घेतलेल्या पुढाकाराचे मान्यवरांनी कौतूक केले.

अश्या उपक्रमांच्या माध्यमातून गाव एकत्र येतो व गावाचा शास्वत स्वरूपाचा सर्वांगीण विकास हा गावकरीच करू शकतात यात प्रामुख्याने तरूनांची घेतलेला पुढाकार प्रशंसनीय आहे शॅडो पंचायतीची स्थापना करून तरूण स्वतः गाव विकास आणि संरक्षणाची जवाबदारी स्विकारून कार्य करत असणारे आणि अशे विवीध उपक्रम राबवणारे मी असे पहिले गाव बघतोय, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष रोशनी ताई पारधी यांनी कोंढाळा हा जिल्हातील पहिला गाव आहे ज्यात शॅडो सारखी विकासात्मक संकल्पना राबवून ज्यात तरुण तरूणी एकत्र येवून गावाच्या विकासाकरीता व विद्यार्थांचा सर्वांगीण विकासाकरीता कार्यरत आहेत. ही संकल्पना प्रत्येक गावात सुद्धा राबविण्यात येवून भरकटलेल्या तरूणांना योग्य दिशा दाखवत विद्यार्थांना योग्य वेळेत योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

तसेच या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेलेले कीसनजी नागदेवे जिल्हाध्यक्ष भाजपा यांनी सुद्धा शॅडोच्या संक्लपनेला शुभेच्छा देत रोजगार निर्मीतीवर सुद्धा तरूणांनी लक्ष केंद्रित करत रोजगार मागणारे नाही तर रोजगार देणारे तरूण आपन व्हावेत यावर सुद्धा शॅडोनी प्रयत्न करत सेवेला पुढे जाऊन परिवर्तनात बदलविण्याकरीता पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन याप्रसंगी केले.

या कार्यक्रमा प्रसंगी खा. अशोकजी नेते, जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवते, सुनीलजी पारधी जिल्हाध्यक्ष ओबिसी मोर्चा, सदानंदजी कुथे संपर्क प्रमुख, नंदुजी पेट्टेवार तालुका अध्यक्ष, संपर्क प्रमुख विलास पा. भांडेकर, उपाध्यक्ष अरूणजी हरडे, कविता बारसागडे महिला तालुकाध्यक्ष वडसा, ओमकार मडावी, योगेश नाकतोडे माजी सरपंच, वसंत दोनाडकर महामंत्री वडसा, प्रमोद झिलपे, पंढरी नकाते, नंदु ढोरे, देवरावजी भोस्कर, अनिल मुलकलवार, योगेशजी ढोरे, अरूनजी कुभलवार, देवदासजी नागोसे, डिगेश्वरजी वरंभे, समस्त शॅडो टिम तसेच गावातील युवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमा दरम्यान गावकऱ्यांंनी खासदार अशोकजी नेते यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.