अमिर्झा वनपरिक्षेत्रांतर्गत वाघाची दहशत : वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या इसमाच्या कुटुंबीयांची खा. अशोकजी नेते यांच्याकडून सांत्वनापर भेट व आर्थिक मदत

52

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मागील पंधरा दिवसांंपासूूून अमिर्झा वनपरिक्षेत्रांतर्गत करमटोला, धुंडेशिवनी येथे वाघाची प्रचंड दहशत असून यामध्ये वाघाने अनेक इसमाच्या नरडीचा घोट घेतलेला आहे. त्यामुळे गावाच्या परिसरातील जनता,नागरिक भयभीत झालेली आहे.
करमटोला येथील स्व. कृष्णाजी महागू ढोणे वय ६० वर्ष  हे दिं.०९/०९/०२२ ला शेत शिवारात काम करीत असतांना तिथेच अचानक दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने  अचानक हल्ला करून यात जागीच  ठार केले.

तसेच याच परिसरातील धुंडेशिवणी येथील स्व. खुशाल तुकाराम निकुरे वय ६५ वर्ष, स्व. दयाराम चुधरी व स्व. नामदेव गुळी या इसमांचा वाघाने नरडीचा घोट घेऊन ठार केला.

अनेक बैलांना सुद्धा जखमी करून सोडलेले आहे. एकिकडे शेतीच्या कामासाठी जाणेसुद्धा आवश्यक असताना जीव धोक्यात घालून जावे लागत आहे. या विवेचनेत जनता अजून याचा तोडगा काढण्यासाठी खा. अशोकजी नेते यांनी आढावा घेत वनविभागाचे अधिकारी व गावकऱ्यांसोबत चर्चा सुद्धा यावेळी करण्यात आली.

याबाबतची माहिती मिळताच या क्षेत्राचे खा. अशोकजी नेते यांनी वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मृतकाच्या परिवारांला घरी जाऊन आर्थिक मदत देऊन परिवारांचे सांत्वन केले. यावेळी खा. अशोकजी नेते यांनी  वनविभागाचे अधिकारी यांना शासन स्तरावर तातडीने कामे करुन मदत देण्याचे निर्देश देऊन सूचना केल्या

याप्रसंगी खा. अशोकजी नेते, जिल्हा महामंत्री प्रशांतजी वाघरे, संपर्क प्रमुख विलास पा. भांडेकर, उपाध्यक्ष अरूणजी हरडे, DCF निलेश शर्मा, वनरक्षक आंबेडोरे, तांबे, दुर्गे वनरक्षक, संभाजी ठाकरे, दिवाकर करकाडे, पंढरी निकुरे, खुशाल चुधरी, मोरेशवर ढोणे, लोमेश ढोणे, भगवानजी ठाकरे, राजेंद्र निकुरे, सुरेश रणदिवे, तसेच गावातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.