भाजपाची ओबीसीकरिता नीती म्हणजे “वापरा आणि फेकून द्या” : महेंद्र ब्राम्हणवाडे

81

– परराज्यात शिकणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रद्द केल्याबद्दल राज्य ED सरकारचे जाहीर निषेध

– परराज्यात शिकणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती पूर्ववत सुरू करण्याची मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भाजप सरकार आणि त्यांचे नेते नेहमी ओबीसीचा तिळका असल्याचे दाखवतात व ओबीसीची कधी जाती-जातीत तर कधी धर्माच्या नावाखाली दिशाभूल करून फक्त मते घेतात. मात्र ओबीसींना त्यांचे हक्क देण्याच्या वेळी पळ काढूपणा करतात. महाविकास आघाडी सरकारच्या काळात परराज्यात शिकणाऱ्या ओबीसींच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली होती. मात्र नुकताच सत्तेत आलेल्या ED सरकारने ती शिष्यवृत्ती रद्द केल्याने आता परराज्यात शिकणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही. हा ओबीसी समाजावर व त्यांच्या विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय आहे. एक विशिष्ट विचाराधरेवर काम करण्याची भाजप सरकारची नीती असून त्यांना बहुजन समाजातील जनतेला अजूनही शिक्षनापासून वंचित ठेवायचे असल्याने असे उपद्रव प्रकार भाजप व ED सरकार कडून करण्यात येत आहे. मागच्या काळात ओबीसी आरक्षणाच्या वेळी सुद्धा भाजपने फक्त ओबीसींचा पुळका असल्याचे ढोंग केले. भाजपला नेहमीच गुलामी वृत्तीची मनुवादी व्यवस्था निर्माण करायची असते, असा आरोप जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी भाजप व ED सरकारवर लावला आहे. त्याचप्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांचे रद्द करण्यात आलेली शिष्यवृत्ती परत लागू करण्यात यावी, अशी मागणीही महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केली आहे.