8 सप्टेंबर रोजी जिल्हा काँग्रेस कमिटीचे मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर जवाब दो आंदोलन

69

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्ह्यातील पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असलेेल्या एकमेव कमलापूर येथील हत्ती कॅम्पचे हत्ती गुजरात राज्यातील एका खाजगी प्राणी संग्रहालयात नेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. मात्र जिल्हाभरात त्याचा विरोध झाला. काँग्रेसच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात आले आणि महाविकास आघाडी सरकारने जिल्ह्यातील हतींचे स्थलांतर थांबवले. राज्यात सत्ता पालट होऊन ED सरकार आली व त्या सरकारने हत्तीच्या स्थलांतराला हिरवा कंदील दिला व अर्ध्या रात्री जिल्ह्यातील पातानीलमधील 3 हत्ती जणू चोराप्रमाणेच चोरून नेले. त्यावेळी केंद्रातील भाजप सरकार विरुद्ध काँग्रेसने आंदोलन केले असता भाजप खासदार – आमदारांनी जिल्ह्यातील हत्ती आपण कुठेही जाऊ देणार नाही असे बोलले. मात्र ते हत्ती चोरीला गेले असता आपले लोकप्रतिनिधी गप्पच आहे. त्यामुळे या राज्यातील ED सरकारचा, केंद्रातील भाजप सरकारचा जिल्हा काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात येणार आहे व जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात 8 सप्टेंबर 2022 रोजी मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर जवाब दो आंदोलन करन्यात येणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने जिल्ह्यातील वन्यजीव व पर्यावरण प्रेमी आणि काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे.