गडचिरोली जिल्ह्यातील विविध समस्यांंबाबत रेखाताई डोळस यांचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांंना निवेदन सादर

112

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली या आकांक्षीत जिल्ह्यातील विविध समस्या त्वरीत सोडवूून जिल्ह्याला न्याय द्यावा, अश्या मागणीचे निवेदन मा. ना. देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री म. रा., मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार वनमंत्री म. रा., मा. ना.सावे सहकार मंत्री यांंना मुंबई येथे रेखाताई डोळस प्रदेश अध्यक्ष, अटल अर्थसहाय्य योजना तथा प्रदेश सदस्य भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र यांंना दिले.
या मागण्यांंमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस, आरोग्य विभाग, शिक्षण विभागासह रिक्त पदांची पदभरती करण्यात यावी, अतिशय बेकार अवस्थेतील रस्ते दुरुस्त करावे, सुरजागड प्रकल्पात पदभरती स्थानिकातून करण्याकरिता कौशल्य प्रकल्प व आय. टि. आय. निर्माण करुन स्थानिकांंना तांत्रिक शिक्षण उपलब्ध करून देेेण्यात यावे, ओबिसी आरक्षण पूर्ववत करणे, अटल अर्थसहाय्य योजनेतील राज्यातील लाभार्थीना लाभ देेण्यात यावा आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मागण्या सोडविण्याचे आश्वासन मा. ना. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांंनी दिले.