प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांचा कुरखेडा शहर विकास मंचच्या वतीने नागरी सत्कार

75

– दुर्गम भागात पदव्युत्तर शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिल्याबद्दल व्यक्त केली कृतज्ञता

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अतुुलनिय योगदान व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांकरिता कला व विज्ञान विषयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिल्याबद्दल दंडाकरण्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांचा कुरखेडा शहर विकास मंचच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून नागरी सत्कार करण्यात आला.

कुरखेडा, कोरची, देसाईगंज तालुक्यात यापुर्वी विज्ञान शाखेत पदव्युत्तर शिक्षणाची सोय नव्हती. त्यामुळे या तालुक्यातील हुशार विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. दंडकारण्य शिक्षण संस्थेच्या कुरखेडा येथील महाविद्यालयाने आता विज्ञान शाखेत मायक्रोबायोलॉजी आणि केमेस्ट्री या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध झाली आहे. प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांनी शैक्षणिक विकासात महत्वपुर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन कुरखेडा शहर विकास मंचच्या वतीने शिक्षकदिनी नागरी सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी शहर विकास मंचचे संयोजक माधवदास निरंकारी, माजी नगराध्यक्ष आशा तुलावी, गणपत सोनकुसरे, नगरसेवक रविंद्र गोटेपफोडे, ऍड. उमेश वालदे, राम लांजेवार, नगरसेवक बबलू हुसैनी, रामभाऊ वैद्य, न. प. सभापती हेमलता नंदेश्वर, नगरसेविका कुंदा तितिरमारे, उल्हास महाजन, आसिपफ शेख, पत्रकार सिराज पठाण, विनोद नागपूरकर, उपप्राचार्य किशोर खोपे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर यांनी केले.