– माँ साहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मौशिखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील आंबेटोला येथील शेकडो माताभगिंनींना वस्त्रभेट
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : हिंदु हदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श जोपासून शिवसेना निर्माण केली. आम्ही शिवसेना.प्रमुख मा..बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. मा. बाळासाहेब ठाकरे व माँ साहेब मीनाताई ठाकरे यांनी शिवसैनिकांना जनसेवेची शिकवण दिली. प्रत्येक शिवसैनिक हा शिवसेनेच्या कुटुंबातील सदस्य माणून माँ साहेब मीनाताई ठाकरे यांनी सेवाभाव जोपासला. त्यांच्या आदर्श कार्याचा वसा कट्टर शिवसैनिक म्हणून हिंदुत्वाची मशाल हातात घेऊन अविरत जोपासणार, असे प्रतिपादन शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केले.
माँ साहेब मिनाताई ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या वतीने मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील आंबेटोला येथील शेकडो माता भगिनींना वस्त्रभेट देण्यात आले, या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
माताभगिंनींना संबोधीत करताना शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार पुढे म्हणाले की, शिवसेनेने सदैव सेवाभाव जोपासून राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व दिले आहे. कोणतीही समस्या निर्माण झाल्यास न्याय मिळवून देण्यासाठी सर्वप्रथम शिवसेना पुढे येते. जनतेच्या समस्या लक्षात घेऊन शिवसेनेच्या वतीने मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील अनेक समस्या आंदोलनाच्या माध्यमातून तथा प्रशासनाकडे पाठपुरावा करून सोडवून या भागातील विकासाला गती देण्याचा प्रयत्न केला आहे. एक शिवसैनिक म्हणून जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असून कोणतीही समस्या असल्यास माझयापर्यंत पोहचवा, ती सोडविण्यासाठी मी नेहमीच कटीबध्द राहीन, अशी ग्वाही शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी वस्त्रभेट कार्यक्रमाप्रसंगी माता भगिनींना दिली.
शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार हे जनतेच्या हाकेला धावून जाणारे खरेखुरे शिवसैनिक आहेत. कोणतीही समस्या त्यांच्यापर्यंत पोहचविल्यास जनतेला न्याय मिळवून देतात. वाढत्या महागाईच्या काळात गोरगरीब जनतेचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत अरविंदभाऊ कात्रटवार यांनी गोरगरीब महिलांना वस्त्रदान करुन सामाजिक बांधीलकीचे दर्शन घडविले आहे. त्यांच्या हातून जनसेवेचे असेच घडत
राहावे आणि जनता नेहमीच त्यांच्या पाठीशी राहील, असे गौरोद्गार माताभगिनींनी याप्रसंगी काढले.
या कार्यक्रमाप्रसंगी अरविंदभाऊ कात्रटवार शिवसेना सहसंपर्क प्रमुख गडचिरोली यांच्यासह यादवजी लोहबरे, संजय बोबाटे, नवनाथ ऊके, स्वप्निल खांडरे, निकेश लोहबरे, संदीप भुरसे, सूरज उइके, संदीप अलबनकर, राहुल सोरते, प्रशांत ठाकुर, दिलीप वालादे, अमित बानबाले, विजय चिलांगे, गणेश दहलाकर, अरुण बारापात्रे, यादव चौधरी, तनबा दाजगये, हरबाजी दाजगये, संजय मेश्राम, केशरी भोयर, नितेश ठाकरे, सुधीर भोयर, गोकुळ बानबले, अखिल भोयर, किशोर राऊत, हरिश्चंद्र खंदरे, दिलीप भोयर, जगदीश जुमनाके, राहुल आत्राम, योगाजी भोयर, लक्ष्मण धूर्वे आदी शिवसैनिक उपस्थित होते.