रेपनपली जवळील खड्ड्यात टाकले सूरजागडचे लोहदगड

54

– माजी जि. प. अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांनी सुरजागड प्रकल्पावर केला रोष व्यक्त

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील सुुरजागड येथील लोहखनिज घेवुन दररोज मोठमोठे ट्रक वाहतूक करत आहेत. त्यामुळे आलाापल्ली – आष्टी रस्ता तर पूर्णपणे खड्डे पडून वाहतुकीस अडचण होतच आहे. मात्र आलापल्ली – सिरोंचा मार्गांनी पण सदर वाहतूक सुरू असून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांनी दामरंचा जात असताना रेपनपलीजवळ ट्रक खड्ड्यात अडकला होता. तेव्हा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष यांनी स्वतः जेसीपी बोलून लोहखनिज घेवून जाणाऱ्या ट्रकमधील लोहदगड सदर रस्त्या वरील खड्ड्यात टाकून मार्ग मोकळा करण्यात आला. यावेळेस माजी पं. स. सभापती भाष्कर तालांडे, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, आलापल्ली येथील प्रतिस्टित नागरिक अग्रवाल भैय्या व इतर नागरिक उपस्थित होते.