– गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली सिनेट सदस्य पदवीधर निवडणूक
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या अधिसभेतील (सिनेट) सदस्य पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत उभे असलेले अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व शिक्षण मंच च्या उमेदवारांना आपले अमूल्य मत देऊन प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहन भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे व माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे यांनी गोंडवाना विद्यापीठातील तमाम पदवीधर मतदारांना आवाहन करतांना केले आहे.
दिनांक ४ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ७ वाजतापासून सायंकाळी ५ वाजतापर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू राहणार आहे. या निवडणुकीत सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मोठ्या संख्येने मतदान करावे असेहि आवाहन त्यांनी यावेळी केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व शिक्षण मंचच्या वतीने स्वरूप सुभाष तारगे, धर्मेंद्र मुनघाटे, सागर विनायक वाजे, यश अनिलराव बांगडे, मनोज भूपाल, प्रशांत दोंतुलवार, जयंत मारोतराव गौरकर, योगिता दिगांबर पेंदाम (डबले), गुरुदास मंगरुजी कामडी व किरण संजय गजपुरे उमेदवार असून या सर्व उमेदवारांना आपले अमूल्य मत देऊन प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी गोंडवाना विद्यापीठ अधिसभेतिल पदवीधर मतदारांना केले आहे.
याबाबत समस्त गोंडवाना विद्यापीठ अधिसभेतील सिनेट पदवीधर मतदार संघातील नोंदणीकृत मतदार यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात गडचिरोली शहरातील अनेक प्रभागात (प्रामुख्याने स्नेहनगर व रामनगर) प्रचार संपर्क करण्यात आले. समस्त पदवीधर मतदार बंधू भगिनींनी आपले अमूल्य मत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व शिक्षण मंचच्या उमेदवार यांना द्यावे, असे आवाहन सुद्धा भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे व योगिताताई पिपरे यांनी केले.