खासदार अशोकजी नेते यांची चामोर्शी येथील पिपरे कुटुंबीयांना सांत्वनपर भेट

49

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी येथील भाजपा नगरसेविका सौ. सोनालीताई आशीष पिपरे यांच्या आई व भाजपा नगरसेवक आशीष पिपरे यांच्या सासूबाई संध्या सुरेश तालेवार (वय 50 रा. गडमौशी, ता सींदेवाही, जिल्हा चंद्रपूर) यांचे दिनांक 29 ऑगष्ट रोजी चंद्रपूर येथे अल्पशा आजाराने निधन झाले. बातमी मिळताच गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांनी 30 ऑगस्ट रोजी चंद्रपूर येथील तालेवार परिवार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन नगरसेविका आशीषभाऊ पिपरे, सोनालीताई पिपरे, दोन मुली, जावई, नातवंड व आप्तपरिवार यांचे सांत्वन केले. स्व. संध्याताई यांची अंत्ययात्रा चंद्रपूर येथून दिनांक 30 ऑगष्ट रोजी सकाळी 10 वाजता चंद्रपूर येथील गुरुव्दारा जवळ असलेल्या राहते निवासस्थान येथून निघाली व मोक्षधाम येथे शेकडो आप्तेष्ट यांच्या उपस्थितीत अंत्यविधी करण्यात आली.