अतुलभाऊ गण्यारपवार यांच्या वाढदिवसानिमित्त चामोर्शी येथील महिला महाविद्यालयात केले वृक्षारोपण

145

– अतुलभाऊ गण्यारपवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्हा परिषद सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती चामोर्शीचे सभापती, जि. प. गडचिरोलीचेे माजी बांधकाम सभापती तथा हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे संस्थापक मा. श्री. अतुलभाऊ गण्यारपवार यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आज, 31 ऑगस्ट रोजी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ चामोर्शी व्दारा संचालीत शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालय चामोर्शी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने महाविद्यालयाच्या प्रांंगणात वृक्षारोपण केले.
मानवी जीवनात वृक्षांना महत्त्व आहे. वने ही राष्ट्राची संपत्ती आहे. सध्याच्या काळात पर्यावरणाकरिता वृक्ष संवर्धन करणे काळाची गरज आहे. तेव्हा विपुल प्रमाणात ऑक्सिजन देणाऱ्या वनस्पती, तुळशी, वड, पिंपळ यांची लागवड करणे अत्यावश्यक आहे. हा पर्यावरणीय दृष्टीकोन ठेवून मा. श्री. अतुलभाऊ गण्यारपवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील विविध ठिकाणी फळझाड, औषधी वनस्पती रोपण सोहळा अशा विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन केलेले होते. याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. व्ही. धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले.
वृक्षारोपण कार्यक्रमात महाविद्यालयातील प्रा. एस. आर.  काशट्टीवार, प्रा. डॉ. एच. डी. निखाडे, प्रा. एन. झाडे, प्रा. सावसाकडे, प्रा. आंबोरकर यांनी सहभाग घेतला. तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री. सुनील आभारे, श्री. सौरभ सहारे, आशिष मेश्राम, संजय गडकर, लोभेश गोर्लावार यांनी सहकार्य केले.