राष्ट्रवादी काँँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचे शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केले स्वागत

55

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राष्ट्रवादी काँँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष माजी मंत्री मा. जयंतराव पाटील दिनांक 30 ऑगस्ट 2022 रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता महाविकास आघाडीचा धर्म पाळीत गडचिरोली जिल्हा शिवसेना सहसंपर्क प्रमुख श्री. अरविंदभाऊ कात्रटवार आणि उपतालुका प्रमुख यादवजी लोहबरे, नवनाथ ऊके, संजय बोबाटे, संदीप भुरसे, अमित बानबले, संदीप अलबनकर, निकेश लोहबरे, राहुल सोरते यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांंचे स्वागत केले. तसेच विविध राजकीय विषयांंवर चर्चा केली.