चामोर्शी येथील नगरसेविका सोनालीताई आशीष पिपरे यांना मातृशोक

59

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी येथील नगरसेविका सौ. सोनालीताई आशीष पिपरे यांच्या मातोश्री व नगरसेवक आशीष पिपरे यांच्या सासूबाई संध्या सुरेश तालेवार (वय 50) रा. गडमौशी, ता. सिंदेवाही, जिल्हा चंद्रपूर यांचे काल दि. 29 ऑगस्ट रोजी चंद्रपूर येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुली, जावई व आप्तपरिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा आज दि. 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता चंद्रपूर येथील गुरुव्दारा जवळ असलेल्या राहत्या घरून निघणार आहे व मोक्षधाम येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे.