पोर्ला येथील शिव मंदिरात तान्हापोळा उत्साहात साजरा

86

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पोर्ला येथील केशवराव दशमुखे यांच्या शिव मंदिरामध्ये तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

कोरोना या माहामारीमुळे सतत दोन वर्ष हा उत्सव होऊ शकला नाही. परंतु यावर्षी शिव मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात तान्हा पोळ्याचा उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी बालगोपालांनी आपले नंदीबैल आकर्षकरित्या सजवून व वेशभूषा करून शिव मंदिरामध्ये आणले. यावेळी नंदीबैलांची विधिवत पूजन केशवरावजी दशमुखे व सिंधुबाई दशमुखे यांनी केले.
तान्हापोळ्यामध्ये नंदीबैल सजावट व वेशभूषा या दोन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नंदीबैल व वेशभूषा स्पधेँचे निरीक्षण श्रीमती दमयंतीताई चुटे व गुरुदेव किरणापुरे यांनी केले. नंदीबैल सजावट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक उत्कर्ष शिवणकर, द्वितीय क्रमांक दीप कोटगले तर तृतीय क्रमांक अदवय उपासे आणि प्रोत्साहन पर जयप्रकाश एमजेलवार यांनी पटकावले. वेशभूषा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आरजु बारसागडे, द्वितीय क्रमांक स्पर्शिका किरणापुरे तर तृतीय क्रमांक नक्ष निशाने यांनी पटकावले.
विजेत्या स्पर्धकांना माजी सरपंच परशुरामजी बांबोळे माजी सरपंच विठ्ठलराव फरांडे, माजी उपसरपंच बापूजी फरांडे तंटामुक्ती अध्यक्ष भास्कर मेश्राम, माजी सभापती गजानन बारसागडे, ग्रामपंचायत सदस्य मुकरूजी लाडवे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. पारितोषिक वितरणानंतर गोपालकाल्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी अशोक चापले, बुवा बांधवले, पांडूजी सूर्यवंशी, गोपाळ झोडगे, महादेव बांबोळे, नामदेव महाराज, मनोज किरमिरे, विनोद किरमिरे, दादाजी दशमुखे, राकेश शिवणकर, व्ही. डी. मेश्राम, गोपाल दाणे, अनिल बांबोळे, विनायक भोयर, पंकज येवले, शाहू महाराज येवले यांच्यासह बहुसंख्य नागरिक व बालगोपाल उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामचंद्र दशमुखे, विनोद दशमुखे, गजानन दशमुखे , अक्षय दशमुखे, शिवा दशमुखे, आराध्य दशमुखे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन विलास दशमुखे यांनी केले तर आभार संतोष दशमुखे यांनी मानले.