चिमूर तालुका भाजपा महिला आघाडीच्या वतीने रक्षाबंधन सोहळा उत्साहात

63

– खा. अशोकजी नेते, आ. बंटीभाऊ भांगडिया यांना भगिनींनी बांधल्या राख्या

विदर्भ क्रांती न्यूज

चिमूर : चिमूर येथे महिला आघाडीच्या वतीने रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी खा. अशोकजी नेते. मा. आमदार कीर्तीकुमार ऊर्फ बंटीभाऊ भांगडिया चिमूर विधानसभा क्षेत्र, वसंतभाऊ वारजुरकर ज्येष्ठ नेते, राजूभाऊ झाडे, डॉ. हटवाद, प्रकाशजी वाकडे, घनश्यामजी डुकरे, राजूभाऊ देवतळे, मायाताई नन्नावरे, ममताताई डुकरे, गीताताई लिंगावत, वर्षाताई शेंडे, रेखाताई कारेकर, कल्पनाताई बोरकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व हजारोच्या संख्येने महिला भगिनींंची उपस्थिती होती. खा. अशोकजी नेते, मा. आमदार कीर्तीकुमार ऊर्फ बंटीभाऊ भांगडिया यांनी महिला भगिनींना मार्गदर्शन केले.