गोविंदा रे गोपाळाच्या गजरात चिमूर येथे दहीहंडी उत्सव साजरा

72

– खासदार अशोकजी नेते, आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या समवेत व अभिनेत्री अक्षया देवधर यांची प्रमुख उपस्थिती

विदर्भ क्रांती न्यूज

चिमूर : आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी चिमूर येथे स्वर्गीय गोटूलालजी भांगडीया व स्वर्गीय धापूदेवी भांगडीया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भांगडीया फाउंडेशनच्या वतीने आयोजित भव्य दहीहंडी स्पर्धेला उपस्थित राहून गोविंदांचा उत्साह वाढविला.

सदर स्पर्धेप्रसंगी खासदार अशोकजी नेते, आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या समवेत व अभिनेत्री अक्षया देवधर (तुझ्यात जीव रंगला फेम, पात्र- अंजली) यांच्या आगमनानंतर त्यांचे भाजयुमो चिमूरच्या वतीने भव्य हार्दिक स्वागत व सत्कार करण्यात आला.

खासदार अशोकजी नेते, आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या समवेत व अभिनेत्री अक्षया देवधर यांनी दहीहंडीचे विधिवत पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन केले. आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी उपस्थित जनतेला दहीहंडीच्या शुभपर्वावर संबोधित केले व शुभेच्छा दिल्या. तसेच सदर कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असलेल्या अभिनेत्री अक्षया देवधर यांनी सुद्धा उपस्थितांशी सवांद साधून गोविंदांचा उत्साह वाढविला.

दरवर्षी भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभपर्वावर देशभरात अनेक ठिकाणी पारंपारिक दहीहंडी व गोपाळकाला उत्सव जोरात साजरा होतो. गत दोन वर्षांपासून कोरोना महामारीने ओढवलेल्या संकटामुळे सगळीकडे शासनाच्या वतीने निर्बंध व प्रतिबंधात्मक नियमावली लागू होती. त्यामुळे दहीहंडी उत्सव साजरा होऊ शकला नाही. पण आता राज्यात युतीचे शासन आहे व राज्याचे माननीय मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे व माननीय उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी कोरोना काळानंतर संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास करून जनतेला निर्बंधमुक्त केले आहे.

तसेच राज्यात शासनाच्या वतीने यंदा विविध उपक्रम राबवून दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येत आहे  त्याच पार्श्वभूमीवर चिमूर येथे सुद्धा आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या मार्गदर्शनाखाली भाजयुमो चिमूरच्या वतीने अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंतभाऊ वारजूकर, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजूभाऊ देवतळे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष निलमभाऊ राचलवार, भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुम्पल्लीवार, माजी जि. प. उपाध्यक्षा रेखाताई कारेकार, भाजपा ज्येष्ठ नेते घनश्याम डुकरे, अशोक कामडी, भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्षा माया नन्नावरे, भाजपा ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष एकनाथ थुटे, भाजपा अनुसूचित जाती आघाडी तालुकाध्यक्ष जयंत गौरकार, भाजपा मच्छीमार सेल तालुकाध्यक्ष शरद गिरडे, भाजपा युवा नेते समीर राचलवार, माजी पं. स. सदस्य पुंडलिक मत्ते, माजी नगरसेवक सतीश जाधव, भाजयुमो शहराध्यक्ष बंटी वनकर, भाजयुमो शहर महामंत्री अमित जुमडे, भाजयुमो शहर महामंत्री श्रेयस लाखे, नैनेश पटेल, आदित्य कारेकार, भाजपा महिला आघाडी शहराध्यक्षा दुर्गा सातपुते, माजी नगरसेविका भारती गोडे, मनिषा कावरे व इतर भाजपा, भाजयुमो पदाधिकारी तथा कार्यकर्ते, गोविंदा आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.