अमोल निकोडे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

61

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्हा परिषदमध्ये चपराशी पदावर कार्यरत असलेले गोकुळनगर येथील रहिवाशी अमोल यादव निकोडे (वय 36) यांचे हृदय विकाराच्या झटक्याने 25 ऑगस्टला रात्रौ 11 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यावर 26 ऑगस्टला कठाणी नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुली असा आप्त परिवार आहे.
अमोल निकोडे हे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील थेरगाव येथील रहिवासी आहेत. ते नोकरी सोबतच इलेक्ट्रॉनिक बाईक व प्लॉट विक्री व्यवसाय करीत असल्याने व मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने ते जनमानसात परिचयाचे होते.