जि. प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी बैलजोडीची विधिवत पूजा करून घेतले आशीर्वाद

58

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : शेतकऱ्यांच्या सर्जा राजाचा शुक्रवारला बैल पोळा सण होता. त्यानिमित्त माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी विधिवत पूजा करून आशीर्वाद घेतला. गत दोन वर्षे कोरोनामुळे सणांंवर संकट उभे झाले होते. आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने सण उत्साहात साजरे होत आहेत. शेतकऱ्यांचा मोठा सण म्हणजे पोळा मानला जातो. यावर्षी पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी स्वगावी इंदाराम येथील हनुमान मंदिरात बैलजोडीची विधिवत पूजा करून आशीर्वाद घेतला. यावेळी शेतकऱ्यांंपुढे असलेले संकट टळो अशी सुद्धा इच्छा व्यक्त केली. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे लहान भाऊ इंदाराम ग्रामपंचायतचे उपसरपंच वैभव कंकडालवार यांच्यासह संपूर्ण कंकडालवार परिवार उपस्थित होते.