भाजयुमो जिल्हा महामंत्री मधुकरजी भांडेकर यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा

191

– वृक्षारोपण, फळवाटप, नोटबुक, पेन वाटप व महामहीम राष्ट्रपतींचा फोटो दिला भेट

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भाजपा युवा मोर्चाचे गडचिरोली जिल्हा महामंत्री श्री. मधुकरजी केशवराव भांडेकर यांचा वाढदिवस 25 ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
भांडेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चामोर्शी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आमगाव (म.) व शहीद बाबुराव शेडमाके विद्यालय आमगाव (म.) येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्र आमगाव (म.) येथील रुग्णांना फळवाटप करण्यात आले. शहीद बाबुराव शेडमाके विद्यालय आमगाव (म.), जि. प. शाळा नेताजीनगर, जि. प. शाळा आमगाव (म.), जि. प. कन्या शाळा आमगाव (म.), जि. प. शाळा वालसरा, जि. प. शाळा भिवापूर येथील विद्यार्थ्यांना नोटबुक व पेन वाटप करण्यात आले. तसेच शहीद बाबुराव शेडमाके विद्यालय (म.), प्राथमिक आरोग्य केंद्र आमगाव (म.), ग्रा. पं. कार्यालय आमगाव (म.), ग्रा. पं. कार्यालय नेताजीनगर, ग्रा. पं. कार्यालय वालसरा, जि. प. शाळा आमगाव (म.), जि. प. शाळा वालसरा, जि. प. शाळा नेताजीनगर, जि. प. शाळा भिवापूर, जि. प. कन्या शाळा आमगाव (म.) येथे महामहीम राष्ट्रपती यांचा फोटो भेट देण्यात आला.

या कार्यक्रमांप्रसंगी भाजपा युवामोर्चा जिल्हा महामंत्री मधुकरजी भांडेकर, माजी सरपंच तथा विद्यमान ग्रा. पं. सदस्य सुभाष कोठारे, माजी सरपंच तथा ग्रा. पं. सदस्य अनिताताई राॅय, माजी उपसरपंच जानुजी बोदलकर, ग्रा. पं. सदस्य वैशालीताई आदे, ग्रा. पं. सदस्य निर्मलाबाई वासेकर, रमेश नरोटे, ज्ञानेश्वर सातपुते, माजी ग्रा. पं. सदस्य लक्ष्मण वासेकर, ग्रा. पं. सदस्य निकेश जुवारे, ग्रा. पं. सदस्य सुशांत राॅय, ग्रा. पं. सदस्य भाऊराव देवतळे, ग्रा. पं. सदस्य तेजराव कोहळे, सचिव सत्यवानजी पिपरे, विजयजी सातपुते, पुरुषोत्तम बावणे, सोमनाथ पिपरे आदी उपस्थित होते.