महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान यांच्याकडून पूरग्रस्त भागातील शेतीची पाहणी

69

– ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करण्याची मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमानात अतिवृष्टी होत असल्याने सतत पूरजन्य परिस्थिती निर्माण होत आहे. नुकताच गोसेखुर्द धरणातून झालेल्या विसर्गामुळे सुद्धा जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊन सतत तीन दिवस शेती पाण्यात बुडून असल्याने अनेक शतकऱ्याचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांवर आता तीबार पेरणकची वेळ आलेली आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेकऱ्याना प्रति हेक्टरी किमान 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी, अशी मागणी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश महासचिव तथा जिल्हाप्रभारी डॉ. नामदेव किरसान यांनी केली आहे.
डॉ. नामदेव किरसान यांनी चामोर्शी तालुक्यातील वाघोली, डोटकुली, घारगाव, रामाला, मोहुर्ली गावातील पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस नेते प्रमोद भगत, हरबाजी मोरे, विलास घोंगडे, जानकीराम पोरटे, कवडुजी पुटकमवार, अनिल कुमरे, नोमाजी सातपुते, अभिजित सातपुते, साईनाथ चलाख, प्रमोद सहारे, शामराव पोरटे, तुळशिराम सातपुते, प्रकाश गेडाम, कृष्णा सातपुते, गुरुदास बुरांडे, श्रीराम म्हशाखेत्री, बापू कुकडकर आदी काँँग्रेस नेते व शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते.